YouthBuild Foundation

Updates

MOU signed between Roraty District 3131 & MIMA CSR & Skills Services

रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१’ आणि युथबिल्ड फाउंडेशन, पुणे यांच्यात ‘हॅपी स्कूल प्रोग्राम’ राबविण्यासाठी सामंजस्य करार

रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि युथबिल्ड फाउंडेशन, पुणे दोन्ही संस्थामध्ये मध्ये दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी, ‘हॅपी स्कूल’ प्रोग्राम या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार करण्यात आला.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे वर्ष २०२४-२५ चे नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा आणि युथबिल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप बावडेकर यांनी सामाजिक करारावर सह्या केल्या.याप्रसंगी रोटरी क्लबच्या हॅपी स्कूल प्रोग्रामचे प्रकल्प संचालक अनंत तिकोने, युथबिल्ड फाउंडेशनचे असो. डायरेक्टर सत्यजित कुलकर्णी तसेच रोटरी क्लबचे इतर ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

रोटरी इंटरनॅशनलने संपूर्ण साक्षरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावरील “रोटरी इंडिया साक्षरता मिशन” हा व्यापक कार्यक्रम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग असलेल्या ‘हॅपी स्कूल प्रोग्राम’ अंतर्गत शाळांमध्ये मूलभूत घटकांची व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हे मूलभूत घटक पुढीलप्रमाणे आहेत – सुस्थितीत सुरक्षित शाळेची इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी, हात धुण्याची केंद्रे, स्वच्छतागृह, क्रीडा साहित्य, ग्रंथालय, विद्यार्थ्यासाठी स्कूल किट्स, शिक्षकांची खोली, बेंचडेस्क इत्यादी.

‘हॅपी स्कूल प्रोग्राम’ अंतर्गत सर्व मूलभूत-पायाभूत सुविधांसह सकारात्मक आणि आनंदी शालेय वातावरण विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवू शकते, चांगली उपस्थिती आणि विद्यार्थ्यांची उच्च धारणा वाढवू शकते. यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणातली एकाग्रता सुधारते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले शैक्षणिक परिणाम दिसून येतात.

दोन्ही संस्था खालील प्रकल्प उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्य करतील:

    • प्रकल्पाच्या निर्धारित नियमानुसार हॅपी स्कूल मध्ये रूपांतरीत होण्यासाठी शाळांचे स्थान आणि संख्या निश्चित करणे.
    • सर्वेक्षणातून शाळेत पुरवल्या जाणाऱ्या सुविधांना अंतिम रूप देणे.
    • पुरविल्या जाणाऱ्या सुविधांसाठी निधीची व्यवस्था करणे.
    • प्रकल्पाची अंमलबजावणी करणे.

अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
श्री अनंत तिकोने- प्रकल्प संचालक, हॅपी स्कूल प्रोग्राम, रोटरी क्लब – 9372630802
श्री सत्यजित कुलकर्णी, एसोसीएट डायरेक्टर, युथबिल्ड फाउंडेशन– 9130605527

Our Clients